Tiranga Times

Banner Image

एक अत्यंत वेदनादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

#CrimeNews #BreakingNews #Sitapur #MarathiNews #TirangaTimesMaharastra
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 29, 2025

Tiranga Times Maharastra
एक अत्यंत वेदनादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सीतापूरमधील हरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनिया कला येथील महामाई मंदिर परिसरात रविवारी सकाळी एका नवविवाहित जोडप्याचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या २२ दिवसांपूर्वी याच मंदिरात त्यांनी विवाह केला होता. ज्या पवित्र स्थळी नव्या आयुष्याची सुरुवात केली, त्याच ठिकाणी दोघांनी एकाच दोरीच्या फासावर लटकून जीवन संपवल्याचे दिसून आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

ते एकमेकांसाठीच जन्मले होते असे म्हणावे लागेल, पण लग्नानंतर अवघ्या २२ दिवसांत मंदिर परिसरातच नवविवाहित जोडप्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: